Posts

महाराष्ट्र सरकार चा हैदराबाद गॅझेट नुसार शासननिर्णय म्हणजे खरे अलुतेदार,बलुतेदार आणि भटके–विमुक्त यांची गळचेपी आहे.

या हैदराबाद गॅझेट च्या नावाखाली  हे ओबीसी झाले तर  आपल्या लोकांनी साधे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होण्याचे स्वप्न बघू नये आणि नोकऱ्यामधील 10 पैकी 7 जागा हेच घेणार. कारण महागड्या शहरात राहण्याचा व क्लासेस चा खर्च हेच लोक जास्त करू शकतात आपले  मागास लोक करू शकत नाहीत. जातीचे प्रमाणपत्र काढताना स्थानिक स्व जातीचे व भ्रष्ट अधिकारी धरून हे प्रमाणपत्र सहज काढतील. आज पुन्हा एकदा सिद्ध झाले की ओबीसी चा फक्त वापर च करून घेतात हे उच्च वर्णीय तसेच राजकारणी लोक.दादागिरी, हुल्लडबाजी आणि शिवीगाळ करून हेकेखोर मागणी केली की सरकार घाबरून झुकते हा नवा पायंडा पडला.  सरकार ओबीसी DNA 🧬 म्हणून सत्तेत आले. लोकसभा निवडणूक 2024 चे चित्र पाहून,काय सांगावे आतून जरांगे व मराठ्यांसोबत शिंदे,पवार यांच्या मदतीने छुपा करार पण केला असेल विधानसभेला साथ द्या मग आपण बरोबर कार्यक्रम लावू असे म्हणून. बहुसंख्य मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेतल्याने सरकारने ओपन ची स्पर्धा कमी केली याचाच अर्थ हिंदुत्ववादी सरकारचा हा मुस्लिम धार्जिनी शासन निर्णय आहे. आणि हो बहुतेक ews ची स्पर्धा कमी करणे हा हेतू देखील असेल. सगे ...

संशयात्मक पवित्र पोर्टल शिक्षक भरती पद्धतीमध्ये सुधारणात्मक बदल करावा

संशयात्मक पवित्र पोर्टल शिक्षक भरती पद्धतीमध्ये सुधारणात्मक बदल करावा           प्रथम रोस्टर, बिंदू ठरवून जाहिराती द्याव्यात.एक महिन्यात सेल्फ सर्टिफाय आणि प्राधान्य सोबत.त्यानुसार परीक्षांचे आयोजन करावे. परीक्षा जर ऑनलाईन असेल तर गुण लगेच डिस्प्ले व्हावेत. रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून द्यावेत. नॉर्मलायझेशन होणार असेल तर त्याचे स्पष्टीकरण मिळावे. Result ऑटोमॅटिक पोर्टल वर एड करावा किंवा पंधरा दिवस ऍड करण्यास वेळ द्यावा.          निवड प्रक्रिया करताना उच्च शैक्षणिक पात्रता व उच्च गुण यानुसार निवड केली जावी. उच्च शैक्षणिक पात्रता असून कमी गुण असल्यामुळे प्राथमिक ला जरी निवड झाली तरी एकदा नियुक्ती झाली की उमेदवार पोर्टल मधून बाहेर.. उच्च शैक्षणिक पात्रता असेल तर त्याने स्पर्धेनुसार गुण घेऊन वरचे पद मिळवावे... आणि प्राथमिक चे प्राधान्य देऊ नये. * प्राधान्याला काही किंमत आहे की नाही? *          निकालाच्या नंतर पंधरा दिवसात निकाल गुण दर्शवणे व सेल्फ सर्टिफाय झाले की यादी डिस्प्ले करून विनामुलखात नियुक्ती महिन्याभ...

मराठी शाळांची वाताहात! सामाजिक दुरावस्था! जबाबदार कोण?

  हे राजकारणी खरे जबाबदार आहे...  जे भ्रष्टाचार करून,पैसे भरुन लागतात ते फुकट खातात..पैसे खाऊन नालायक शिक्षक भरणारे हेच.. राजकारणी.. लोकांना, तरुण पोरांना हाताशी धरून निवडणुकीत प्रचार करायला लावणारे व त्यांना फुकट पाजून व्यसनी बनवणारे हेच... लोकांना पैसे देऊन मतदान करण्याची व भ्रष्ट, फुकट आयते खायची सवय लावणारे हेच.. एखाद्या बाप व्यसनी असला की त्याच्या पाल्यावर संस्कार व शाळेत नियमितता राहत नाही.. शाळेत शिक्षक देखील भ्रष्ट असतील तर त्या लेकराचे वाटोळेच..... शेतकऱ्यांना कमी भाव देऊन दरीद्री ठेवणारे हेच... बेरोजगार, व्यसन यामुळे लोकांना गरीब व मजबूर जीवन जगण्यास भाग पडणारे हेच.... आणि फुकट राशन,. लाडकी बहीण, फुकट बस अशा योजना आणून कमावण्याची इच्छा मारणारे हेच.... भांडणे, चोऱ्या, गंभीर गुन्हे यातून कार्यकर्त्यांना वाचवणारे हेच आणि गुंडांना हाताशी धरून राजकारण करणारे हेच... राजकारणी आहेत.. अवैध्य धंद्यांना अभय देणारे हेच आणि दारूच्या दुकाणासाठी लायसन देणारे हेच... शाळेत जाणाऱ्या पोराला, युवकांना, त्यांच्या बापाला नोट दाखवून प्रचाराला नेणारे हेच.... गरिबांना घर दार, लेकरं वाऱ्यावर...

प्रलंबित पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2017

          *' नवनाथ केसभट '* नावाचा अवलिया ज्यानी 2017 च्या शिक्षक भरतीची पहिली यादी ऑगस्ट 2019 ला लागल्या नंतर अपूर्ण राहिलेला रिक्त ,अपात्र, गैरहजर राऊंड आणि माजी सैनिक राऊंड लावण्यासाठी 2019 ते 2023 हे चार वर्षे अतुलनीय अशी धडपड केली. लागलेल्या याद्या घेऊन अभ्यासपूर्वक माहिती गोळा केली व एकटाच पुण्याला चकरा मारत होता. आमच्या सारखे सोबती भेटल्यानंतर ते पटवून दिले आणि आमचा 25 ते 30 जणांचा गट बनला. पाठपुरावा करताना सूत्र एकच....पाठपुरावा करायला घराबाहेर पडताना स्वतःचा खर्च स्वतः करायचा.आमच्या सगळ्या मध्ये सर्वाधिक मुंबई पुणे चकरा मारणारा भोवरा देखील हाच होता. अशाप्रकारे स्वतःच्या एक एकर शेतातून पिकलेल्या कापसाचे एक लाख रुपये याने पाठपुराव्यात खर्च केले. त्याचे कष्ट, नियोजन आणि आमच्या सर्वांचे एकत्रित एकजुटीचे अथक प्रयत्न फळाला येऊन या दोन्ही याद्या लावण्याच्या मंत्रालयीन परवानग्या मिळवण्यात यश मिळाले,परंतू 2023 शिक्षक भरतीची ओढ असल्याने 2017 च्या या याद्या आयुक्त कार्यालयातून लागण्यासाठी टाळाटाळ, दिरंगाई होत असताना 5 दिवस, 14 दिवस असे आंदोलने आम्हाला सोबत घेऊन ...

"बेरोजगारांची मानसिकता व सरकारी मनमानी कारभार"

"कंत्राटी भरती सारखे जाचक निर्णय घेवून सुद्धा सर्व सामान्य लोक, बेरोजगार मंडळी सरकारच्या विरोधात काहीही बोलायला तयार नाही. का?तर म्हणे! आज कमवले तरच आपले घर चालते म्हणे! परंतु आपले पुढील आयुष्य तसेच आपल्या पिढ्यांचे भवितव्य आपण अंधारात ढकलत आहोत याकडे कुणाचेच लक्ष नाही." आंदोलन वगैरे हे काही सांगु नका सर...आम्ही झोपलोय झोपू द्या.आम्ही घर कोंबडे.आम्हाला खुराड्यातच रहायची सवय आहे. आज आमचे पोट भरले बास झाले.कोणी या आणि आमचा बळी घ्या.आम्ही माना टाकलेल्या आहेत कोणी ही येऊन कापा. जेव्हढा मनमानी कारभार चालतोय चालू द्या.जेव्हढे अन्याय कारक निर्णय सरकारला घ्यायचे घेऊ द्या.आम्हाला आज त्रास नाही आणि आमचे आजचे भागले बास झाले. भावी पिढ्यांचे शोषण व्हायचे तर होऊ द्या. देश पुन्हा मूठभर लोकांचा गुलाम होणार असेल तर होऊ द्या.आम्हाला आज जगुन घ्यायचे.आमच्या गप्प राहण्याने आम्ही जर भावी पिढ्यांच्या,देशाच्या  पारतंत्र्याचे  कारण बनुन दोषी ठरणार आहोत तर ठरु द्या.लढणारे लढतील नाहीतर मरतील पण आम्हाला आयते कटोऱ्यात जे पडेल ते घ्यायची  नाहीतर  अन्याय गिळायची सवय  लागली आहे.मुळात आमच्या धम...

नोकरी पाहिजे? मोजा पैसे!

भ्रष्ट संस्थाचालक आणि त्यांच्या वर मेहरबानी करणारे राजकारणी काही स्वतः संस्था चालक असतात अशा वरदहस्तामुळे आज शिक्षणसंस्था म्हणजे पैसा छापायचा कारखाना अशी परिस्थती उद्भवली आहे. एकीकडे शासकीय शाळांना शिक्षक कमी पडावे म्हणून भरती करायची नाही आणि दुसरीकडे आपल्या खाजगी संस्थांचे काळे धंदे चालू ठेवायचे. म्हणजे लोकांना यांच्याच शाळांचा पर्याय बास.नुकसान होते गरिबाच्या लेकराचे. संस्थेवरच काय पण काही ठिकाणी शासकीय नोकऱ्या देखील आर्थिक व्यवहार करून दिल्या जातात.कुठे कुठे राजकीय हित संबंध पाहिले जातात.गुणवंत विद्यार्थी घडवणारी शाळाच गुणवंताची कदर करत नाही.याचा परिणाम खूप भीषण होत आहे.यामुळे जो लाखो रुपये अशी नोकरी मिळवण्यासाठी देवू शकत नाही त्या गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने उच्च शिक्षण घेवूच नये काय? त्याच्या कष्टाने कमावलेल्या ज्ञानाचा स्वतःच्या जीवन जगण्यासाठी समाज हित,देश हितासाठी उपयोगच होत नाही.मग त्यांनी करावे काय? आणि या परिस्थती पासून कोणीच अनभिज्ञ नाही.सगळयांना हे माहीत असते तरी देखील कोणीच यावर बोलत नाही, विरोध करणे दूरची गोष्ट आहे.देश हित,समाज हित आणि भलेपणाचे भाषणं ठोकणारेच अशी...

कोरोना: समज, कर्तव्य आणि संरक्षण

* सुरक्षित राहू, सुरक्षित ठेवू * * Stay safe, keep safe * ---- गजानन बहिवाळ ----        जालना जिल्ह्यातील पहिली कोविड रुग्ण 65 वर्षाची वृध्द महिला डॉक्टरांचे मेहनतीने आणि त्यांच्या धीर देण्याने तसेच स्वतःकडे असलेल्या हिम्मत आणि दुर्दम्य इच्छा शक्तीच्या बळावर  बरी होऊन घरी सुरक्षित पोहचली.मित्रांनो हे उदाहरण आहे की कोरोना हा एव्हढा भयानक आजार नाही.मागील चार महिन्यातील परिस्थितीतील अशा विविध अनुभवावरून कोरोनाविषयी संकटा संदर्भात माझे मत प्रतिपादन मी करत आहे. 1. कोरोनावर आपण सर्व प्रथम संसर्ग होण्यापूर्वी सुरक्षेची काळजी घेवून, योग्य आहार व व्यायाम घेवून रोगप्रतिकार शक्ती वाढवून मात करू शकतो.  2.चुकून संसर्ग झालाच तर  तो संसर्ग आपल्या नकळत घरच्यांना होणार नाही अशा खबरदारीच्या स्वच्छतेच्या सवयी लावून घेवून, घरातच राहून सामाजिक संसर्ग, प्रसार आपण टाळू शकतो. 3.निदान झाल्यानंतर देखील त्यावर आपण डॉक्टरांच्या साथीने व आपल्या रोगप्रतिकार शक्तीने व हिंमतीने मात करू शकतो.  4.म्हणून कोरोनाला घाबरून तान व रक्तदाब वाढून जीव जाण्याचा धोका जास्त असल्याने घाबरून जा...