Posts

Showing posts from October, 2023

"बेरोजगारांची मानसिकता व सरकारी मनमानी कारभार"

"कंत्राटी भरती सारखे जाचक निर्णय घेवून सुद्धा सर्व सामान्य लोक, बेरोजगार मंडळी सरकारच्या विरोधात काहीही बोलायला तयार नाही. का?तर म्हणे! आज कमवले तरच आपले घर चालते म्हणे! परंतु आपले पुढील आयुष्य तसेच आपल्या पिढ्यांचे भवितव्य आपण अंधारात ढकलत आहोत याकडे कुणाचेच लक्ष नाही." आंदोलन वगैरे हे काही सांगु नका सर...आम्ही झोपलोय झोपू द्या.आम्ही घर कोंबडे.आम्हाला खुराड्यातच रहायची सवय आहे. आज आमचे पोट भरले बास झाले.कोणी या आणि आमचा बळी घ्या.आम्ही माना टाकलेल्या आहेत कोणी ही येऊन कापा. जेव्हढा मनमानी कारभार चालतोय चालू द्या.जेव्हढे अन्याय कारक निर्णय सरकारला घ्यायचे घेऊ द्या.आम्हाला आज त्रास नाही आणि आमचे आजचे भागले बास झाले. भावी पिढ्यांचे शोषण व्हायचे तर होऊ द्या. देश पुन्हा मूठभर लोकांचा गुलाम होणार असेल तर होऊ द्या.आम्हाला आज जगुन घ्यायचे.आमच्या गप्प राहण्याने आम्ही जर भावी पिढ्यांच्या,देशाच्या  पारतंत्र्याचे  कारण बनुन दोषी ठरणार आहोत तर ठरु द्या.लढणारे लढतील नाहीतर मरतील पण आम्हाला आयते कटोऱ्यात जे पडेल ते घ्यायची  नाहीतर  अन्याय गिळायची सवय  लागली आहे.मुळात आमच्या धम...