नोकरी पाहिजे? मोजा पैसे!
भ्रष्ट संस्थाचालक आणि त्यांच्या वर मेहरबानी करणारे राजकारणी काही स्वतः संस्था चालक असतात अशा वरदहस्तामुळे आज शिक्षणसंस्था म्हणजे पैसा छापायचा कारखाना अशी परिस्थती उद्भवली आहे. एकीकडे शासकीय शाळांना शिक्षक कमी पडावे म्हणून भरती करायची नाही आणि दुसरीकडे आपल्या खाजगी संस्थांचे काळे धंदे चालू ठेवायचे. म्हणजे लोकांना यांच्याच शाळांचा पर्याय बास.नुकसान होते गरिबाच्या लेकराचे. संस्थेवरच काय पण काही ठिकाणी शासकीय नोकऱ्या देखील आर्थिक व्यवहार करून दिल्या जातात.कुठे कुठे राजकीय हित संबंध पाहिले जातात.गुणवंत विद्यार्थी घडवणारी शाळाच गुणवंताची कदर करत नाही.याचा परिणाम खूप भीषण होत आहे.यामुळे जो लाखो रुपये अशी नोकरी मिळवण्यासाठी देवू शकत नाही त्या गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने उच्च शिक्षण घेवूच नये काय? त्याच्या कष्टाने कमावलेल्या ज्ञानाचा स्वतःच्या जीवन जगण्यासाठी समाज हित,देश हितासाठी उपयोगच होत नाही.मग त्यांनी करावे काय? आणि या परिस्थती पासून कोणीच अनभिज्ञ नाही.सगळयांना हे माहीत असते तरी देखील कोणीच यावर बोलत नाही, विरोध करणे दूरची गोष्ट आहे.देश हित,समाज हित आणि भलेपणाचे भाषणं ठोकणारेच अशी...