मराठी शाळांची वाताहात! सामाजिक दुरावस्था! जबाबदार कोण?

 हे राजकारणी खरे जबाबदार आहे...

 जे भ्रष्टाचार करून,पैसे भरुन लागतात ते फुकट खातात..पैसे खाऊन नालायक शिक्षक भरणारे हेच.. राजकारणी..

लोकांना, तरुण पोरांना हाताशी धरून निवडणुकीत प्रचार करायला लावणारे व त्यांना फुकट पाजून व्यसनी बनवणारे हेच...

लोकांना पैसे देऊन मतदान करण्याची व भ्रष्ट, फुकट आयते खायची सवय लावणारे हेच..

एखाद्या बाप व्यसनी असला की त्याच्या पाल्यावर संस्कार व शाळेत नियमितता राहत नाही.. शाळेत शिक्षक देखील भ्रष्ट असतील तर त्या लेकराचे वाटोळेच.....

शेतकऱ्यांना कमी भाव देऊन दरीद्री ठेवणारे हेच...

बेरोजगार, व्यसन यामुळे लोकांना गरीब व मजबूर जीवन जगण्यास भाग पडणारे हेच.... आणि फुकट राशन,. लाडकी बहीण, फुकट बस अशा योजना आणून कमावण्याची इच्छा मारणारे हेच....

भांडणे, चोऱ्या, गंभीर गुन्हे यातून कार्यकर्त्यांना वाचवणारे हेच आणि गुंडांना हाताशी धरून राजकारण करणारे हेच... राजकारणी आहेत..

अवैध्य धंद्यांना अभय देणारे हेच आणि दारूच्या दुकाणासाठी लायसन देणारे हेच...

शाळेत जाणाऱ्या पोराला, युवकांना, त्यांच्या बापाला नोट दाखवून प्रचाराला नेणारे हेच....

गरिबांना घर दार, लेकरं वाऱ्यावर सोडून पैशासाठी सभेला नेऊन बसवणारे हेच राजकारणी आहेत..

चांगल्या शिक्षकांना निवडणूक, झाडे लावून फोटो अपलोड करणे, योगा डे ऑनलाईन नोंदणी व साजरे करणे, सूर्यनमस्कार नोंदणी व साजरे करणे, शाळाबाह्य सर्वेक्षण, संविधान सप्ताह आयोजन व माहिती ऑनलाईन भरणे, पुस्तके वाचन व विश्लेषण ऑनलाईन करणे,विद्यार्थ्यांची माहिती सरल, यू डायस, अपार, pat, निपुण, HPC,ऑनलाईन करणे, शाळा मूल्यांकन sqaaf माहिती ऑनलाईन भरणे, पोषण आहार रेकॉर्ड, नव्या नव्या gr प्रयोगाची प्रयोग शाळा, शिक्षक भरती वेळोवेळी न करून अपुरे शिक्षक ठेवणे, गळक्या खोल्या, अपुऱ्या सोयी सुविधा, घाणेरडे वातावरण असे कामे व वातावरण देऊन गुणवत्ता विकासाचे कामे करण्यापासून वंचित ठेवणारे हेच.... राजकारणी... 

पवित्र पोर्टल मधून लांबलचक व ढोंगी शिक्षक भरती करणारे हेच...

यांचेच अंगठे बहाद्दर कार्यकर्ते शालेय शिक्षण समिती च्या माध्यमातून हस्तक्षेप, भ्रष्टाचार करतात त्याला जबाबदार देखील हेच राजकारणी....

Comments

Popular posts from this blog

संशयात्मक पवित्र पोर्टल शिक्षक भरती पद्धतीमध्ये सुधारणात्मक बदल करावा

महाराष्ट्र सरकार चा हैदराबाद गॅझेट नुसार शासननिर्णय म्हणजे खरे अलुतेदार,बलुतेदार आणि भटके–विमुक्त यांची गळचेपी आहे.

नोकरी पाहिजे? मोजा पैसे!