प्रलंबित पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2017

          *'नवनाथ केसभट'* नावाचा अवलिया ज्यानी 2017 च्या शिक्षक भरतीची पहिली यादी ऑगस्ट 2019 ला लागल्या नंतर अपूर्ण राहिलेला रिक्त ,अपात्र, गैरहजर राऊंड आणि माजी सैनिक राऊंड लावण्यासाठी 2019 ते 2023 हे चार वर्षे अतुलनीय अशी धडपड केली. लागलेल्या याद्या घेऊन अभ्यासपूर्वक माहिती गोळा केली व एकटाच पुण्याला चकरा मारत होता. आमच्या सारखे सोबती भेटल्यानंतर ते पटवून दिले आणि आमचा 25 ते 30 जणांचा गट बनला. पाठपुरावा करताना सूत्र एकच....पाठपुरावा करायला घराबाहेर पडताना स्वतःचा खर्च स्वतः करायचा.आमच्या सगळ्या मध्ये सर्वाधिक मुंबई पुणे चकरा मारणारा भोवरा देखील हाच होता. अशाप्रकारे स्वतःच्या एक एकर शेतातून पिकलेल्या कापसाचे एक लाख रुपये याने पाठपुराव्यात खर्च केले. त्याचे कष्ट, नियोजन आणि आमच्या सर्वांचे एकत्रित एकजुटीचे अथक प्रयत्न फळाला येऊन या दोन्ही याद्या लावण्याच्या मंत्रालयीन परवानग्या मिळवण्यात यश मिळाले,परंतू 2023 शिक्षक भरतीची ओढ असल्याने 2017 च्या या याद्या आयुक्त कार्यालयातून लागण्यासाठी टाळाटाळ, दिरंगाई होत असताना 5 दिवस, 14 दिवस असे आंदोलने आम्हाला सोबत घेऊन उभे करून देखील कार्यवाही होत नसल्याचे पाहून उपोषणाला बसण्याचा निर्णय घेणारा व तुम्ही फक्त सोबत रहा म्हणुन जीवाची बाजी लावणारा खुळा देखील हाच. पाठपुराव्यात सर्वांचाच बराच खर्च झालेला असताना कधीही कुणाकडे पैशाची मागणी केलेली नसताना आंदोलनाला 20 ते 25 दिवस पुण्यात राहणे व खर्च करणे कठीण जात असताना केवळ आमच्या आग्रहास्तव मदतीची मागणी शेवटी केली.तेव्हा मदत करणाऱ्या आपल्या बांधवांमुळे तर हिम्मत वाढलीच होती पण त्यांनी देखील दिलेल्या पैशातील खर्चाचा एक एक रुपयाचा हिशोब हा माणूस आंदोलन स्थळी आम्हाला उघड उघड देत होता.काठावर आसल्यामुळे लागेल की नाही याची शाश्वती नसताना "काठावरील आशेने बसलेले गरजवंत लागले तरी जिंकलो" असे औदार्य दाखवणार नवनाथ ज्याच्या प्रयत्नामुळे रिक्त, अपात्र व गैरहजर यादी व 1 ते 5 संस्थांची यादी आयुक्तांना लावावीच लागली आणि 332 ते 400 लोकांना रोजी रोटी मिळाली. काही विघ्न संतोषी लोकांमुळे ती उशीरा ताटात पडली त्याचे दुःख तर आहेच पण 'देर आय दुरुस्त...' म्हणून सगळे 2025 ला का होईना पण रुजू झाले. स्वतःचे शिक्षक व्हायचे स्वप्न अपूर्ण असताना संपर्कात असलेले 20 ते 25 जण आणि कधीही पुढे न आलेले सव्वा तीनशे लोक लागल्या नंतर देखील समाधानी आणि आनंदी झालेला नवनाथ माझा मित्र असल्याचा मला अभिमान आहे. त्याने केलेल्या या अजोड कष्टामुळे व घेतलेल्या पुढाकारामुळे मी नोकरीला लागलो याची जाणीव मला जीवनभर राहीलच पण तरीही कोणी त्याचे नाव घेवो अथवा न घेवो पण मी त्याचे येथे जाहीर आभार मानून ऋण व्यक्त करतो.  

    इतरांच्या भल्यासाठी मैदानात उतरायला नेहमी तयार असणारा असा उदार माणूस पुन्हा शिक्षक भरतीत दुसरा कोणी असूच शकत नाही. माझ्या या मित्राचे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करावे हेच साकडे मी देवाला घालेल.

Comments

Popular posts from this blog

संशयात्मक पवित्र पोर्टल शिक्षक भरती पद्धतीमध्ये सुधारणात्मक बदल करावा

महाराष्ट्र सरकार चा हैदराबाद गॅझेट नुसार शासननिर्णय म्हणजे खरे अलुतेदार,बलुतेदार आणि भटके–विमुक्त यांची गळचेपी आहे.

नोकरी पाहिजे? मोजा पैसे!