नोकरी पाहिजे? मोजा पैसे!
भ्रष्ट संस्थाचालक आणि त्यांच्या वर मेहरबानी करणारे राजकारणी काही स्वतः संस्था चालक असतात अशा वरदहस्तामुळे आज शिक्षणसंस्था म्हणजे पैसा छापायचा कारखाना अशी परिस्थती उद्भवली आहे. एकीकडे शासकीय शाळांना शिक्षक कमी पडावे म्हणून भरती करायची नाही आणि दुसरीकडे आपल्या खाजगी संस्थांचे काळे धंदे चालू ठेवायचे. म्हणजे लोकांना यांच्याच शाळांचा पर्याय बास.नुकसान होते गरिबाच्या लेकराचे. संस्थेवरच काय पण काही ठिकाणी शासकीय नोकऱ्या देखील आर्थिक व्यवहार करून दिल्या जातात.कुठे कुठे राजकीय हित संबंध पाहिले जातात.गुणवंत विद्यार्थी घडवणारी शाळाच गुणवंताची कदर करत नाही.याचा परिणाम खूप भीषण होत आहे.यामुळे जो लाखो रुपये अशी नोकरी मिळवण्यासाठी देवू शकत नाही त्या गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने उच्च शिक्षण घेवूच नये काय? त्याच्या कष्टाने कमावलेल्या ज्ञानाचा स्वतःच्या जीवन जगण्यासाठी समाज हित,देश हितासाठी उपयोगच होत नाही.मग त्यांनी करावे काय? आणि या परिस्थती पासून कोणीच अनभिज्ञ नाही.सगळयांना हे माहीत असते तरी देखील कोणीच यावर बोलत नाही, विरोध करणे दूरची गोष्ट आहे.देश हित,समाज हित आणि भलेपणाचे भाषणं ठोकणारेच अशी कारस्थाने करतात.मग कशासाठी कष्टाने गुणवत्ता कमवायची? पास व्हायची लायकी नसताना पैसा देवून नकला करून पास व्हायचे.आणि पैसा कमवून कुठेतरी पैसे देवून नोकरी मिळवायची? वाह रे! दुनियादारी! वाटायचे शिक्षण क्षेत्रात तरी भ्रष्टाचार नसेल.हे म्हणजे पवित्र क्षेत्र.पण पैसा भरून त्यात भरती होणारे काय पावित्र्य जपणार? त्यांनी पैसा भरला म्हणजे तेही विद्द्यार्थ्या कडून कमाई करणार.म्हणजे गरिबाने शिक्षण घेवू ही नाही.थोडक्यात काय तर शिक्षण क्षेत्रात देखील दलाली आहे म्हणा.
पण या भ्रष्टाचाराचा दूरगामी परिणाम काय याकडे कुणाचे लक्षच नाही.भावी पिढी किती गुणवंत घडणार? किती संस्कार त्यांच्यात रुजणार?अनैतिक मार्गाने नोकरी मिळवणारे किती नैतिकता भावी पिढी मध्ये रुजवणार? किती लोकांच्या भल्याचा विचार करणार आणि किती सुजाण,समजदार आणि ज्ञान संस्कार असणारे देशाचे नागरिक भविष्यात असणार! याचा कधीच कोणीच विचार करत नाही. परिणाम आजच दिसत आहे. आज बहुतांश पालकांसह विद्यार्थ्यांचा ओढा हा नक्कला करुन पास होण्यात तसेच टक्केवारी मिळवण्याकडे जास्त दिसतो.आजकालचे बरेच स्वतःला शिक्षक म्हणवून घेणारे मंडळी आर्थिक व्यवहार आणि पर्ट्याकरून मदत करतात.दहा पंधरा वर्षापूर्वीचा पदवीधर आणि आताचा पदवीधर यातील अंतर तर दिसतेच पण वर्तनात देखील जमीन आसमानाचे अंतर आहे. याप्रमाणे चालूच आहे आणि पुढेही चालूच राहिल्यास आणखीही विपरीत परिणाम भोगावे लागतील. आज चांगल्या अधिकाऱ्यांची आणि राजकारण्यांची कमतरता का भासते? वादविवाद,हाणामाऱ्या, विभक्त कुटुंबपद्धती का वाढत आहेत.कारण शिक्षणाचा अर्थात शिक्षण देणाऱ्यांचा दर्जा ढासळल्याने.ज्ञान संस्कार याला काही अर्थच उरलेला नाही. केवळ कागदी घोडे दवडले जातात. कुठे कसे बोलावे, कसे आचरण असावे? वडीलधाऱ्यांशी कसे वागावे? किती फरक पडत आहे. हे सगळ्यांना दिसते पण काही घेणे देणे नाही.उलट आजकाल तसेच असते बाबा हे सांगायला मोकळे.गुन्हेगारांना रोकायला पोलीस यंत्रणा आहे पण प्रतिष्ठीत गुन्हेगारांना कोण रोकणार? कुणालाच काही दुःख वाटत नाही का? की यापुढे गरिबांनी शिक्षण घेण्यात आपला खर्च आणि लेकरांचे वर्ष वायाला घालवूच नये? खूप चिड येते या व्यवस्थेची.
वास्तव विचार मांडले सर
ReplyDeleteधन्यवाद
Delete