कोरोना: समज, कर्तव्य आणि संरक्षण

* सुरक्षित राहू, सुरक्षित ठेवू *
* Stay safe, keep safe *
---- गजानन बहिवाळ ----
       जालना जिल्ह्यातील पहिली कोविड रुग्ण 65 वर्षाची वृध्द महिला डॉक्टरांचे मेहनतीने आणि त्यांच्या धीर देण्याने तसेच स्वतःकडे असलेल्या हिम्मत आणि दुर्दम्य इच्छा शक्तीच्या बळावर  बरी होऊन घरी सुरक्षित पोहचली.मित्रांनो हे उदाहरण आहे की कोरोना हा एव्हढा भयानक आजार नाही.मागील चार महिन्यातील परिस्थितीतील अशा विविध अनुभवावरून कोरोनाविषयी संकटा संदर्भात माझे मत प्रतिपादन मी करत आहे.
1. कोरोनावर आपण सर्व प्रथम संसर्ग होण्यापूर्वी सुरक्षेची काळजी घेवून, योग्य आहार व व्यायाम घेवून रोगप्रतिकार शक्ती वाढवून मात करू शकतो. 
2.चुकून संसर्ग झालाच तर  तो संसर्ग आपल्या नकळत घरच्यांना होणार नाही अशा खबरदारीच्या स्वच्छतेच्या सवयी लावून घेवून, घरातच राहून सामाजिक संसर्ग, प्रसार आपण टाळू शकतो.
3.निदान झाल्यानंतर देखील त्यावर आपण डॉक्टरांच्या साथीने व आपल्या रोगप्रतिकार शक्तीने व हिंमतीने मात करू शकतो. 
4.म्हणून कोरोनाला घाबरून तान व रक्तदाब वाढून जीव जाण्याचा धोका जास्त असल्याने घाबरून जाण्याची काहीच गरज नाही 
5.मुळात भीती ही कोरोनाची नसून त्याच्या अनियंत्रित प्रसाराची आहे आणि असली पाहिजे.म्हणून तसा प्रसार होवू नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची आहे.

 6.जो पर्यंत कोरोनावर लस किंवा औषध निघत नाही तो पर्यंत कोरोनाचे समूळ उच्चाटन कठीण वाटते म्हणून प्रत्येकाने स्वतःला संसर्ग होणार नाही या काळजी सोबतच चुकून आपल्याला संसर्ग झालेला असू शकतो पण आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली म्हणून लक्षणे नसतील असे गृहीत धरून, समोरील व्यक्ती ही बाधित आहे असे गृहीत धरून आपणच काळजी घेणे गरजेचे आहे आणि त्याच साठी आता आपल्याला स्वच्छतेच्या सवयी कायम ठेवत आपली व आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवून न भिता आपली सर्व कामे करावी लागतील.

7. मृत्यूचा धोका हा कमी रोग प्रतिकार शक्ती असणाऱ्या व आजारी व्यक्ती साठी जास्त संभवतो म्हणून या सर्व परिस्थितीत वृद्धांची,आजारी व्यक्ती व लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागेल.त्यांची काळजी घेणे म्हणजे त्यांची सेवा करणे नव्हे तर त्यांचा बाहेरच्या गर्दीशी संपर्क येवू नये व बाहेर फिरणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीने स्वतःच्याच घरात त्यांच्या पासून शारीरिक अंतर ठेवून राहणे असे आहे.
प्रत्येक व्यक्तीने हे आपले प्रतेकाचे कर्तव्य आहे असे मानून अशाप्रकारे काळजी घेतल्यास प्रसार नियंत्रित करून आपण कोरोना पासून स्वतः सहित कुटुंबीय व समाज संरक्षण करू शकतो आणि उत्पन्नाचे माध्यम चालू ठेवून आर्थिक स्थिती देखील सांभाळू शकतो. कोरोनाच्या नावाखाली जर लाखोंची लुट होत असेल तर अशी लूट देखील त्यांना संधी न देवून आपणच थांबवू शकतो.

Comments

  1. Replies
    1. Very good idea and suggestions, but some people are not taken self precaution. That is very risk fuly every people.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

संशयात्मक पवित्र पोर्टल शिक्षक भरती पद्धतीमध्ये सुधारणात्मक बदल करावा

महाराष्ट्र सरकार चा हैदराबाद गॅझेट नुसार शासननिर्णय म्हणजे खरे अलुतेदार,बलुतेदार आणि भटके–विमुक्त यांची गळचेपी आहे.

नोकरी पाहिजे? मोजा पैसे!