खोट्यांचा बाजार आणि खऱ्यांचे दुकान !
खोट्यांचा बाजार आणि खऱ्यांचे दुकान !
खोट्यांच्या बाजारात खऱ्यांचे दुकान चालत नाही असे आज म्हणण्याची वेळ आली आहे. काही लोक म्हणतात तुम्हाला आज कळाले का? तसे तर ते खूप लवकर कळाले ... पण आम्ही शिक्षक आहोत शिक्षक....
आम्ही शिक्षक मंडळी खरे लोक घडवण्यासाठी राबत आहोत आणि राबत राहणार....आमचे कार्य आहे प्रामाणिक काम करत राहणे आणि विद्यार्थ्यांवर संस्कार करून भविष्यातील खऱ्यांचा बाजार भरवणारे देशाचे नागरिक घडवणे.
प्रामाणिकपणाच्या याच अट्टाहासामुळे माझे व्यक्तिमत्त्व लोकांसाठी विश्वासार्ह बनले आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मला समर्थपणे योग्य मार्गावर जगता आले.
काही लोक मला बदलायला सांगणारे भेटले. पण पंचवीस वर्षात अंगीकारलेल्या तत्वांची,संस्कारांची होळी करून नवीन दिशाहीन मूल्य विरहित मार्ग निवडणे संयुक्तीक वाटले नाही. आदर्श प्रामाणिक गुरुजन लाभले. समाजहित, मानवता जपणाऱ्या शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्था सोबत काम करण्याची संधी मिळाली. बरेच प्रामाणिक मित्र मंडळी भेटले आणि आपण या चळवळीत एकटे नाही आहोत हे देखील कळाले आणि त्यामुळे संघर्षमय वाटचालीला हुरूप आला. बरेच प्रामाणिक विद्यार्थी देखील घडवता आले आणि यापुढेही घडवत राहणार.
याच प्रामाणिकपणाचे फळ मला देखील मिळाले. माझ्या आई वडिलांना त्यांच्या प्रामाणिकपणाचे फळ दोन्ही मुले नोकरीला लागून मिळाले.*सत्य परेशान हो सकता हैं पराजीत नहीं*. हे खरेच आहे हे सिद्ध झाले. हवी ती नोकरी आणि योग्य ती शाळा व योग्य ते सहकारी मित्र रूपाने मला मिळाले.
इतिहास साक्षी आहे खोट्यांचा बाजार आणि खोट्यांचे शासन हे जास्त काळ नाही टिकले. *प्रामाणिकपणाच्या पायावर उभी राहणारी खरेपणाची इमारत बांधायला वेळ लागतो परंतु चिरकाल टिकते.*
Comments
Post a Comment