संशयात्मक पवित्र पोर्टल शिक्षक भरती पद्धतीमध्ये सुधारणात्मक बदल करावा
संशयात्मक पवित्र पोर्टल शिक्षक भरती पद्धतीमध्ये सुधारणात्मक बदल करावा
         प्रथम रोस्टर, बिंदू ठरवून जाहिराती द्याव्यात.एक महिन्यात सेल्फ सर्टिफाय आणि प्राधान्य सोबत.त्यानुसार परीक्षांचे आयोजन करावे.
परीक्षा जर ऑनलाईन असेल तर गुण लगेच डिस्प्ले व्हावेत. रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून द्यावेत. नॉर्मलायझेशन होणार असेल तर त्याचे स्पष्टीकरण मिळावे. Result ऑटोमॅटिक पोर्टल वर एड करावा किंवा पंधरा दिवस ऍड करण्यास वेळ द्यावा.
निवड प्रक्रिया करताना उच्च शैक्षणिक पात्रता व उच्च गुण यानुसार निवड केली जावी. उच्च शैक्षणिक पात्रता असून कमी गुण असल्यामुळे प्राथमिक ला जरी निवड झाली तरी एकदा नियुक्ती झाली की उमेदवार पोर्टल मधून बाहेर.. उच्च शैक्षणिक पात्रता असेल तर त्याने स्पर्धेनुसार गुण घेऊन वरचे पद मिळवावे... आणि प्राथमिक चे प्राधान्य देऊ नये. *प्राधान्याला काही किंमत आहे की नाही?*
निकालाच्या नंतर पंधरा दिवसात निकाल गुण दर्शवणे व सेल्फ सर्टिफाय झाले की यादी डिस्प्ले करून विनामुलखात नियुक्ती महिन्याभरात देऊन.. त्यापुढील महिन्या भरात रिक्त अपात्र गैरहजर आणि रूपांतरित यादी लावावी.
अर्थात निकालाच्या नंतर पुढील तीन महिन्यात संस्थांची यादी लावली. स्वतः शासनाने मुलाखत घ्यावी आणि निवड यादी लावावी.संस्थांना रेकॉर्डिंग द्यावी. म्हणून
*मुलाखतीसह शिक्षक भरती* साठी संस्थांचा भ्रष्टाचार टाळण्यासाठी शासनाचा एक नियमित काम करणारा विभाग स्थापन करावा. असाही भरतीला वेळ (वर्षे) लागतोच मग वेळोवेळी मुलाखती घेण्याचे काम त्यांनी करावे.
*या प्रक्रियेमध्ये जे काही नियम असतील ncte नुसार किंवा पात्रता असेल किंवा आरक्षण असेल ते परीक्षेपूर्वी जे असतील तेच लागू करावे. त्यानंतर पुन्हा जाहिराती नंतर चे नियम , शासन निर्णय, आरक्षण, gr लागू करू नये.*
थोडक्यात जाहिराती अगोदर देऊन एक महिन्यानंतर नंतर परीक्षा व पंधरा दिवसात निकाल लावून निकालानंतर विनामुलाखत भरती दोन ते तीन महिन्यात पार पाडून तद्नंतर मुलाखत विभागाचे काम यथावकाश गरजेनुसार पारदर्शक रित्या चालू द्यावे.
Comments
Post a Comment